शिरपूर वन विषयी | About Shirpur.one
आमचा उद्देश:
“आपले शिरपूर” हे एक वैशिष्ट्यपूर्ण शहर असून विविध क्षेत्रातील अनेक उपलब्धींसाठी जगप्रसिद्ध आहे. शिरपूरमध्ये अनेक हॉटेल्स, मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, देवस्थाने, पर्यटन स्थळे, भौगोलिकदृष्ट्या महत्वाची ठिकाणे, बाजारपेठा आहेत. छोट्यापासून मोठ्यापर्यंत अनेक व्यवसाय आहेत. परंतु, एवढी विविध वैशिष्ट्ये असून देखील या सर्वांची माहिती एका ठिकाणी संकलित नाही. आपली हीच गरज ओळखून ही सर्व माहिती एका छताखाली आणण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत.
शिरपूर वन चा उद्देश म्हणजे शिरपूर मधील सर्व प्रकारची माहिती एका जागी उपलब्ध करून देणे.
ही वेबसाईट शिरपूरमधील wholesale व retail व्यापारी तसेच service provider जसे कि टी.व्ही., मोबाईल रिपेरिंग, इंस्टॉलेशन, इत्यादी, यासाठी आहे. तसेच येथे व्यापार सोडून इतरही प्रकारची माहिती संकलित करण्यात येते जसे की वेगवेगळे कार्यक्रम, प्रेक्षणीय स्थळे, देवस्थाने, विविध घडामोडी, इत्यादि.
येथे आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करू शकता. तसेच आपण विकत असलेले प्रॉडक्ट्स किंवा देत असलेल्या सर्विसेस याबद्दल माहिती देऊ शकता जेणेकरून आपल्याला आपल्या व्यवसायवृद्धीत मदत होऊ शकेल.
जर आपणास वेबसाइट संदर्भात काही मदत हवी असेल तर आम्हाला 800-77-07-111 या क्रमांकावर संपर्क साधावा. आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू. आपल्याला विनंती करतो कि आजच आपल्या व्यवसायाची माहिती आपल्या पत्त्यासकट व हवे असल्यास आपल्या मोबाईल नंबरसकट टाकावी.
धन्यवाद.
—
श्री. कमलेश कुरणकर